पंचशील विद्यालयाचा शंभर टक्के निकाल- प्राविण्य श्रेणीत 4, प्रथम श्रेणीत 97, आणि द्वितीय श्रेणीत 33 विध्यार्थी उत्तीर्ण
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे) द्वारा संचालित सालेकसा तालुक्यातील मक्काटोला येथील पंचशील विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून यंदा 2024 च्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेत विज्ञान व कला शाखा मिळून एकूण 134 विध्यार्थी बसले होते व सर्वच विध्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्राविण्य श्रेणीत 4 विध्यार्थी, प्रथम श्रेणीत 97 विध्यार्थी, आणि द्वितीय श्रेणीत 33 विध्यार्थी यशस्वी झाले. विद्यालयातून प्रथम क्रमांकावर विज्ञान शाखेचा विद्यार्थी वंश खेमराज भांडारकर याने 80.33 टक्के गुण प्रथम क्रमांक प्राप्त केला, सुशीलकुमार धनराज कटरे याने 78.17 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. तेजस्विनी सुजित कठाने हिने 77.00 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. कला शाखेतून कु. विमोह विजय जनबंधू यांनी 77.00 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला, कु. प्रियंका मारोती भेंडारकर हिने 72.67 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक, तर कु. पुनम पुरुषोत्तम हत्तीमारे हिने 72.17 गुण पटकावून तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे) चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम, विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.नंदेश्वर, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या. 12 परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे घरी जाऊन केले स्वागत पंचशील विद्यालयाचे प्राचार्य एस.पी. नंदेश्वर, शिक्षक एन.आर. रामटेके, टी.के. चौधरी, एम.बी.रंगारी, पी.एम. कोरे यांनी सर्व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन उत्तीर्ण विध्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.व पुढील उच्च शिक्षण व उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: मक्काटोला येथील पंचशील विद्यालयाने कायम ठेवली उत्कृष्ठ निकालाची परंपरा, ID: 30061
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: मक्काटोला येथील पंचशील विद्यालयाने कायम ठेवली उत्कृष्ठ निकालाची परंपरा, ID: 30061
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]