सालेकसा तालुका भाजपच्या वतीने 60 गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे) 2023-24 या शैक्षणिक सत्रात सालेकसा तालुक्यातील आश्रम शाळेसह सर्व वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षेत वर्गातून पहिला व दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या 60 गुणवंत विद्यार्थ्यांचा सालेकसा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने 20 जून रोजी पूर्ती पब्लिक शाळा सालेकसाच्या सभागृहात सत्कार करून गुण गौरव करण्यात आले. गुणवंताचा” सत्कार कार्यक्रम अंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे संयोजक आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र भाजपचे निवडणूक प्रभारी तथा माजी आमदार संजय पुराम हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत-रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भगवान वीर बिरसा मुंडा, विधेची देवी शारदा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन, पूजन, व पुष्पहार अर्पित करून करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षता भाजपचे तालुका अध्यक्ष गुमानसींह उपराडे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.सविताताई संजय पुराम, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रतीभाताई परिहार, जिल्हा महामंत्री डॉ. राजेंद्र बडोले, भाजप पदाधिकारी पूर्ती पब्लिकच्या संचालिका सौ. शालिनीताई बडोले, पिपरियाचे उपसरपंच गुणाराम मेहर, राजाराम धांमडे, बब्लू ठाकूर, राजेंद्र ब्राह्मणकर, सुरेंद्र खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनात माहिती दिले की भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून गुणवंताचा सत्कार हा कार्यक्रम दरवर्षी नियमित घेतला जात आहे. त्यानुसार यावर्षी सुद्धा आज 20 जून रोजी तालुक्यातील 60 गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करून गौरव करण्यात येत आहे. गुणवंत विद्यार्थांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. गुमानसिंह उपराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात यशाची पायरी चढत असताना सर्वात अगोदर आपले ध्येय निश्चित करावे त्या नुसार आपले कार्य करावे. परिस्थिती कितीही बिकट असली तर त्यावर मात करून उतोरोत्तर प्रगती करावी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन सौ.सविता पुराम यांनी केले असून संचालन प्रा. नीता धकाते, व उपस्थिताचे आभार शालिनीताई साखरे यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, त्यांचे पालक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.