🔹गावाच्या मध्यभागी असल्याने वट पौर्णिमा सावित्रीच्या पूजनासाठी होते महिलांची गर्दी
साखरीटोला/सालेकसा-: वाढदिवस व आई वडिलांच्या स्मृती निमित्य विविध उपक्रम राबविले जातात तर आठवण म्हणून अनेक कुटुंबायाकडून वृक्षारोपण केले जाते. त्याच प्रमाणे सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांच्या वाढदिवसानिमित्य 2 आक्टोम्बर 2011 रोजी साखरीटोला येथील संताजी चौकातील रिकाम्या जागेवर वट रोपट्याची लागवट करून सतत संगोपन करण्यात आले दरम्यान वाढदिवसानिमित्य लावलेल्या वट रोपट्याने आता सुंदर आकार घेतले आहे. वाढदिवसानिमित्य वट रोपट्याचे वृक्षारोपण करते वेळी रमेश चुटे व त्याचे मित्र प्रभाकर दोनोंडे, सुनील अग्रवाल, डाँ. संजय देशमुख, डाँ. अजय उमाटे, अरविंद गजभिये, संतोष बोहरे, राजू काळे, संजय कुसराम, अशोक मेहर, सागर काटेखाये, देवराम चुटे, यांच्या प्रमुख उपस्थित गायत्री परिवारचे पुजारी प्रसादीलालजी पटेल यांचा हस्ते पूजन करून वडाच्या रोपट्याची लागवट करण्यात आले होते. त्या छोटयाश्या रोपटंयाने आता भव्य व सुंदर आकार घेतले असून प्रसस्त जागा असल्यामुळे अन्य पूजन व वटपौर्णिमा सावित्रीच्या पूजनासाठी महिलांची गर्दी होत असते. सदर वडाच्या झाडाच्या परिसरात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक गावकरी खुर्च्यावर बसून वडाच्या झाडाची सावली थंड हवेचा लाभ घेत असतात. देवरी-गोंदिया हायवे महामार्गांवर असलेल्या साखरीटोला येथील रस्त्यावर येत असलेल्या वड, पिपंळ, आंबा अश्या अनेक मोठया झाडाची कत्तल करण्यात आले होते. त्यामुळे या झाडाला विशेष महत्व आले आहे. शेतीची आवड व निसर्गावर विशेष प्रेम असले रमेश चुटे यांनी सांगितले की मानवासाठी झाडांचे मोठे योगदान असल्यामुळे या प्रेरणेतून दर वर्षी कुठेना कुठे वृक्षारोपण करीत असतो मात्र दररोज दिसत असलेल्या या वटवृक्षांला पाहून विशेष आनंद मिळत असते. धार्मिक परंपरेनुसार आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून वटपौर्णिमाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे अनेक व्रत आहेत त्यापैकीच एक व्रत हे वटसावित्रीचे आहे. सौभाग्यवती स्त्रिया विधीवत विष्णु देवाची, लक्ष्मी आणि वडाच्या झाडाची पुजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सर्व दु:ख नाहीशी होतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या दिवशी यापुजेला विशेष महत्व असते.
