🔹गरजूंसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा, व दुःखद घटनेच्या प्रसंगी घरपोच जेवणाची व्यवस्था कार्याचे सर्वत्र कौतुक
गोंदिया/साखरीटोला-: महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश व छ्तीसगड राज्याच्या सीमांत स्थळी असून गोंदिया येथील झाडे कुणबी समाज संघटनेच्या वतीने वेळोवेळी समाज हितासाठी पुढाकार घेतले जाते. गरजू समाजबांधवाना शासकीय रुग्णालयात मदतीची गरज असो, रुग्णांना रक्ताची गरज असो, रेशन वाटप, रक्तदान, प्लाझ्मा, तसेच गरजूं रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका सेवाही सुरू करण्यात आले आहे. अप्रिय व दुःखद घटना घडल्यास त्यांच्या घरी घरपोच जेवणाची व्यवस्था झाडे कुणबी समाज भोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येत असते. समाज हितार्थ संस्थेचे कार्य नियमित सुरु असून भविष्यात सुरूच राहील झाडे कुणबी समाज संस्था, समाज हितासाठी कटीबद्ध असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकुमार चुटे, व सचिव नीलेश चुटे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. समाज बांधवाच्या सहकार्याने वेळोवेळी रक्तदान करून रक्त पेढीत रक्त गोळा केले जाते. आणि ज्यां रुग्णांना रक्ताची गरज आहे त्यांना वेळेवर रक्त पुरवठा उपलब्ध करून दिले जात असते. शहर व ग्रामीण भागातील कुणबी समाज बांधवासाठी मागील दोन वर्षांपासून ही संस्था सतत कार्य करीत आहे. झाडे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी घराबाहेर पडून लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे समाजात एक नवा उत्साह संचारला आहे. गरजूंसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा वरदान ठरत आहे. तर अप्रिय व दुःखद घटनेच्या प्रसंगी अडचणीच्या वेळी घरपोच जेवणाची व्यवस्था करणे या कार्याची सर्वत्र प्रसंशा केली जात आहे. अशी विविध सामाजिक कामे संस्थेमार्फत केली जात आहेत. समाजातील गरजू बांधवाना मदत व्हावी, समाज एकत्रित यावे यासाठी सतत प्रयत्न केले जात असून दरवर्षी कोजागिरी निमित्य सभेचे आयोजन केले जाते, तसेच एक वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करून त्या माध्यमाने समाजातील लोकांच्या व्यवसायाचे प्रचार प्रसार केले जात असते. भविष्यातही झाडे कुणबी समाज संस्था गोंदिया, समाज बांधवाना सहकार्य करण्यास सदैव तत्पर राहील. असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकुमार चुटे, आणि सचिव नीलेश चुटे यांनी व्यक्त केले आहे.