गोंदियाः- सरकार लोकांना स्वाभिमानी बनविण्यापेक्षा लाचार बनविण्याची योजना अंमलात आण्याचे काम जास्त करतो आहे.भारतामध्ये संविधान लागु झाल्यापासुन ओबीसी जनगन्ना करण्याचा संर्घष ओबीसी संघटना करित आहेत.त्याकडे सरकार लक्ष देत नाही.ओबीसी महीलांनी १५०० रुपयामध्ये एवढे खुष होण्याची गरज नाही. ओबीसी महीलांनी जन्म दिलेल्या मुलांना सांविधानिक पदावर जाण्यासाठी सरकार कधीच कायदे बनवित नाही.आज ओबीसी महीला महाराष्ट्रात ६५ टक्के आहेत.तुमच्या मुलांना सांविधानिक पदावर किती नौकरी आहेत त्यासाठी तुमचे लक्ष कधी लागले आहे का? आज सर्वात जास्त नुकशान ओबीसी समाजाचा होत आहे. ओबीसी समाजाची जनगन्ना झाली तरी ओबीसी समाजातील सांविधानिक क्षेत्रात ओबीसी ६५ टक्के सर्व क्षेत्रात नौकरी लागतील तर तुमच्या मुलांना १ लाख पगार महीण्याला मिळेल तर तुमच्या कुटुंबाचा आर्थिक विकास होणार मग तुम्हाला १५०० योग्य की ओबीसी जनगना करुन तुमचे मुले सांविधानिक अधिकार पाहीजे यांचे विचारमंथन करणे ओबीसी समाजाच्या महीलांनी करावा
कृष्णा ब्राम्हणकर संपादक