गोंदियाः- भारत देश हा कित्येक लोकांचा गुलाम राहीलेला देश आहे.भारत हा 1947 साली स्वातंत्र झाला त्यानंतर भारत देशाला संविधान मिळाला त्यानंतर या देशात ग्रामपंचायत,राज्य,देशाच्या कायद्याची निर्मिती झाली.त्यानंतर देशात जन्मलेल्या लोकांना जिल्ह्यांच्या ठिकाणी कोतवाल हे पोलिस स्टेशन मध्ये जन्मांच्या नोंदी करित होते.त्यानंतर गावातील नागरिकांना त्यांच्या मुलांच्या नोंदणी ग्रामपंचायत मध्ये कराव्या म्हणुन कायदा काढण्यात आला.पण ओबीसी,एस.सी.एस.टी लोकांना कायद्याची जाणिव नसल्यामुळे त्यांनी स्वतःआपल्या मुलांच्या नोंदी ग्रामपंचायत मध्ये न केल्यामुळे आज बहीणीना दाखला मिळेना त्यांची डोमेसाईल बनेना ही अवस्था आपल्या पुर्वजांनी का केली तर त्यांना शिक्षण नव्हतं व कायद्याची जानीव नव्हती त्यामुळे आजच्या बहिणीना त्रास सहन करावा लागतो. ओबीसी,एस.सी.एस.टी महीलांनी कायद्यात जर बदल झाला नसता तर महाराष्ट्रातील 50 टक्के महीला लाडली बहीना पासुन वंचित राहील्या असत्या म्हणुन महीलांनी 1500 रुपये घ्या पण आपल्या पिढीला भविष्यात तुमच्या सारखा त्रास होवु नये यासाठी कायद्याची जाणिव करुन आपल्या मुलांचे डाक्युमेंट व्यवस्थित करुन ठेवा.




