गोंदियाः- NEET-UG परिक्षा पेपर फुटी मुळे देशात अनेक विद्यार्थ्याचा नुकशान झाला आहे.त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी व्दारे १२ जुलै २०२४ रोजी संपुर्ण भारत देशात 550 जिल्ह्यात एक दिवशीय धरणे आंदोलन होणार आहे. तरी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन विद्यार्थ्याचा नुुकशान होवु नये. भविष्यात मुलांना योग्य न्याय मिळावा व आत्महत्या सारखे प्रकार घडु नये यांची दखल घेवुन हा धरणा आंदोलन आहे. संपुर्ण भारत देशात NEET-UG परिक्षा ५ जुलै २०२४ ला NTA व्दारा घेण्यात आली होती.ह्या वर्षी २४ लाख विद्यार्थी परिक्षा मध्ये बसले होते. NTA ने विद्यार्थ्याची गैर व्यवस्था पाहण्यात आली.भरपुर परिक्षा केंद्रावर चुकीच्या प्रश्न पत्रिका दिल्यामुळे विद्यार्थ्याचा वेळ वाया गेला. परिक्षा च्या दिवशी बिहार मध्ये पेपर लिंक झाला त्यामुळे तेथील १३ आरोपीना ना बिहार पोलिस ने अरेस्ट केला. गोंदिया जिल्ह्यातील संपुर्ण विद्यार्थी व पालकांनी १२ जुलै २०२४ ला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी येण्याची विनंती बहुजन मुक्ती पार्टी करीत आहे.
जिल्हाध्यक्ष दिलीप जुडा