🔹संजय पुराम यांची सालेकसा पत्रकार संघ, कार्यालयाला औपचारिक भेट
साखरीटोला/सालेकसा-: पत्रकार हा लोकतंत्राचा चौथा स्तंभ असून समाजाचा आरसा आहे. आज समाजात जनप्रतिनिधी पेक्षा जास्त विश्वास पत्रकारांवर आहे हे खरं असून नुकतेच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री “माझी लाड़की बहीण योजनेची” पुरेशी व योग्य माहिती देण्याचं काम पत्रकारांनी करावे जेणेकरून एकही बहीण सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. सदर योजनेला लागू झाल्यानंतर विरोधक “जलबिन मछली” प्रमाणे फडफडू लागले आहेत, योजनेसंबंधी उलट सुलट व खोटी माहिती देऊन जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. माहिलांनी भ्रमित होऊ नये ही योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केले असून सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार आहे. नुकत्याच पारपडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधान व आरक्षणाबद्दल विरोधकांनी जनतेत खोटी माहिती पुरवून भ्रम निर्माण केले होते व खोटारडे पणात ते यशस्वी पण झाले. तसेच आता काही तरी नवा फंडा शोधत आहेत. तरी सदर योजनेसंबंधी योग्य माहिती पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावे असे उद्गार आमगाव देवरीचे माजी आमदार संजय पुराम यांनी सालेकसा येथील पत्रकार भावनाला भेट देऊन पत्रकारांशी चर्चा दरम्यान केले. पुढील चर्चेदरम्यान संजय पुराम यांनी सालेकसा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपंचायत द्वारे अचानक कर वाढ करने, कोटीटोला सिंचन प्रकल्प, व तालुक्यातील रखडलेले रोड रस्त्यासंदर्भात पत्रकारांशी विस्तृत चर्चा केले व सर्व समस्यांना आपण मार्गी लावू येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शासन दरबारापर्यंत पोहोचवू असे आश्वासन उपस्थित पत्रकारांना दिले. याचा फलित आगामी काही दिवसातच पहायवा मिळेल असे ते पत्रकारासी बोलले. यावेळी तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, उपाध्यक्ष डाँ. राजेंद्र बडोले, राकेश रोकडे, सालेकसा पत्रकार संघांचे अध्यक्ष मायकल मेश्राम, बाजीराव तरोने, गुणाराम मेहर, प्रकाश टेभंरे, रवी सोनवाने, गुलशन बनोठे, किशोर वालदे, अमित वैध, इंजी. ऋषींकुमार चुटे आदी उपस्थित होते.
