साखरीटोला/सालेकसा- : (रमेश चुटे)
श्री स्वामी समर्थ नेत्रालय नागपूर व जिल्हा अधत्व नियंत्रण समिती गोंदिया माजी आमदार संजय पुराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विधमानाने आमगाव देवरी-विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीयाबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन पूर्ती पब्लिक स्कुल सालेकसा येथे 6 आगस्ट रोजी करण्यात आले आहे. शिबीर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित असून तज्ञ् डाक्टराच्या चमुकडून रुग्णांची तपासणी करून मोफत चष्मे व मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरवर्षीनुसार यावर्षीसुद्धा माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून श्री स्वामी समर्थ नेत्रालय नागपूर, जिल्हा अधत्व नियंत्रण समिती गोंदिया, माजी आमदार संजय पुराम मित्र परिवाराच्या संयुक्त विधमानाने माजी आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीयाबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे भव्य आयोजन करून आरोग्य विषयक चांगला सामाजिक उपक्रम राबवला आहे.
तज्ञ् डाक्टराकडून डोळ्याची तपासणी करण्यात येईल, तपासणी नंतर चष्म्याचा नंबर देण्यात येईल, व गरजू रुग्णांना चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोतीयाबिंदूच्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात येणार आहे. तपासणी नंतर आवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालय गोंदिया येथे करण्यात येईल. रुग्णांनी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी स्वतःचे मतदान ओळख पत्र सोबत आणणे गरजेचे आहे. क्षेत्रातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावे असे आव्हान सौ. सविता संजय पुराम व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी सौ. सविता पुराम, डाँ. राजेंद्र बडोले, देवराम चुटे, शुभम फुंडे, सरोज परतेती, राजेंद्र ब्राम्हणकर, नितेश वालोंदे, राम चक्रवर्ती यांच्याशी संपर्क साधावे असे आव्हान करण्यात आले आहे.
