तंटामुक्ती अध्यक्ष – राजकुमार येरणे व उपाध्यक्ष- तुळशिराम वाघमारे यांच्या कडे तंटामुक्तीची धुरा सिरपुरबांधः- (दि.09) ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे ग्रामसभा आयोजित केली होती.ग्रामसभा ही तहकुब झाल्यावर तहकुब ग्रामसभा दि.०९-०९-२०२४ रोज सोमवारला पार पडली.ग्रामसभेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन वैयक्तिक व सामुहिक कामाचे नियोजन करण्यात आले.माहात्मा गांधी तंटामुक्ती समिती ची निवड शुध्दा करण्यात आली.त्यामध्ये यांच्या आधी तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा जगतराम शिवणकर हे सलग 3 ते 4 वर्ष राहीले.०९-०९-२०२४ ला ग्रामसभेत सर्वानुमते सर्वांनी अध्यक्ष पद हे राजकुमार सिताराम येरणे यांच्या कडे नविन तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जिम्मेदारी उपाध्यक्ष पदाची जिम्मेदारी तुळशिराम वाघमारे कडे आली.ग्रामपंचायत सिरपुरबांध हे गट ग्रामपंचायत असल्यामुळे प्रत्येक गावचे सदस्यांची निवड करण्यात आली. गावातील संरपच नितेश भेंडारकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा जगतराम शिवणकर,ग्रा.पं.सदस्य योगराज शिवणकर,फुलचंद फुंडे,महेंद्र देशमुख यांनी स्वागत केले.गावातील समस्या,दारुबंदी,गावातील तंटे कशा पध्दतीने सोडविणार याकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागले आहे.
