देवरीः- देवरी तालुका येथे सनसामान्यांना त्यांच्या अधिकाराची माहीती व्हावी यासाठी देवरी येथील पदाधिकारी यांनी पुढाकार घेवुन २१/०९/२०२४ रोज शनिवारला ठिक ५.०० वाजता सिताराम मंगल कार्यालय आमगांव रोड देवरी येथे कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे.लोकांना संविधान काय आहे त्यामुळे लोकांना काय मिळतो हे माहीती नाही.त्यांचे अधिकार काय आहेत त्यांची सविस्तर माहीती मिळणार आहे. भारतामध्ये बहुजनाच्या थोरपुरषांनी समाजाला योग्य न्याय देण्यासाठी आपले जिवन पणाला लावले.पण बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे पाहीजे त्याप्रमाणात समाजाला शिक्षणाचा प्रभाव समजला नाही.बहुजन समाजाला संविधान देवुन 75 वर्ष होवुन ग्रामीण भागात संविधान समजला नाही. अखिल भारतीय अंधश्रध्दा निमुर्लन समिती देवरी ने व्याख्याते प्रा,श्याम मानव (राजकीय विश्लेषक व संस्थापक संघटक अ.भा.अंधश्रध्दा निर्मुलन समिती ,मा.दसरथजी मडावी – प्रशिध्द विचारवंत तसेच कार्यक्रमांचे अध्यक्ष – श्री- सहसराम कोरोटे -आमदार हे राहणार आहेत. कार्यक्रम स्थळ- सिताराम मंगल कार्यालय आमगांव रोड देवरी येथे ठिक सायं.५.०० वा. जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी समिती तर्फे विनंती करण्यात येते.