देवरीः- महाराष्ट्र सरकार हे शेतकरी लोकांना लुभावन देवुन त्यांची लुट करण्याचे कारस्थान महाराष्ट्र सरकार करित आहे.आज शेतकरी लोकांना सरकार 2000 देवुन शेतकरी लोकांची थट्टा करित आहे.आज शेतकरी स्वतःच्या शेतातील मालाची किंंमत ठरवु शकत नाही.त्याला २४ तास विज मिळत नाही.महाराष्ट्र सरकारकडुन सोयाबिन,कापुस यांसह इतर शेतमालाला पर्याप्त हमीभाव न देणे, प्रधानमंत्री पिकविमा योजना रद्द करुन I.R.M.A. ईर्मा कायद्यावर आधारित पिक विमा अथवा सबसिडीची अंमलबाजावणी न करणे इत्यादी मार्गाने महाराष्ट्रातील शेतक-यांना कायम अडचणीत आणले जात आहे. शेतक-यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष रामसुरेश वर्मा,राष्ट्रीय संरक्षक-वामन मेश्राम साहेब, महाराष्ट्र राज्य प्रभारी – बालाजी कांबळे , दिपक राजाभाऊ इंगळे – (प्रदेश कार्यकारी अध्यक्ष,राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र, यांच्या नेतृत्वात देवरी तालुक्यातील तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देतांनी मनोज लोहे (भारत मुक्ती मोर्चा भंडारा- गोंदिया जिल्हा प्रभारी) तालुक्यातील पदाधिकारी वंदना डोंगरे( भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष) सतदेवे सर ( अंधश्रध्दा निर्मुलन समिती अध्यक्ष) राजकुमार बंन्सोड( बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष) करुणा नंदागवळी – भारत मुक्ती मोर्चा (उपाध्यक्ष) दिलीप जुडा( राष्ट्रीय आदीवासी एकता परिषद तालुकाअध्यक्ष)पृथ्वीराज नंदेश्वर ( वंचित बहुजन पार्टी जिल्हा महासचिव)किशोर राऊत(वंचित बहुजन पार्टी तालुकाध्यक्ष) मेघनाथ भांडारकर (राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा तालुका उपाध्यक्ष देवरी) कृष्णा ब्राम्हणकर (राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा तालुकाध्यक्ष देवरी )गुणवंता कवास( संरपच ग्रा.पं. सेरपार) रामकिशन उईके(माजी संरपच ढिवरिनटोला)भोजराज मडावी( उपसंरपच ढिवरीनटोला) इत्यादी पदाधिकारी यांनी निवेदन दिले.