देवरीः- देवरी तालुक्यातील सिरपुरबांध,पदमपुर व संपुर्ण तालुक्यात लष्कर अळीचा प्रार्दुभाव झाल्याने शेतकरी लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकशान झाले आहे.मागील महिण्यात 9 ताऱखेला मोठ्या प्रमाणात पुर आल्यामुळे शेतकरी लोकांचे पिक पाण्यासोबत वाहुन गेले. लष्कर अळी ला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी लोकांनी हजारो रुपयांच्या औषधी फवाऱणी ड्रोनच्या साहयाने करुन शुध्दा लष्कर अळी आटोक्यात आली नाही. लोकांचे नुकशान एवढे झाले की शेतकरी 1 किलो धान्य घरी नेवु शकत नाही.भरपुर वर्तमान पत्रामध्ये यांची दखल घेण्यात आली. आज दि.09/10/2024 ला संपुर्ण जिल्हा कृषी विभागाची टिम व तालुका टिम प्रत्यक्ष तपासणी केली असता त्यांना शेतक-यांचे लष्कर अळीने मोठ्याप्रमाणात नुकशान झाल्याचे सांगितले त्यामध्ये त्यांनी उपाय योजना सांगितल्या की पाणि जर यामध्ये राहीले असते तर लष्कर अळीचे एवढे प्रमाण वाढले नसते.शेतकरी यांनी सांगितले की पुरामुळे विद्युत पुरवठा पुर्ण बंद असल्यामुळे पाणि शेतीला होवु शकले नाही. शेतकरी यांनी अधिकारी यांच्याशी चर्चा करतांनी शासनाने शेतकरी यांना १०० टक्के नुकशान भरपाई द्यावी अशी विनंती अधिका-याशी केली. आज पाहणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ – चव्हान सर,समाधान वाघमोळे (टेक्निकल आफीर्स गोंदिया)एल.एम.राजपुत(तालुका कृषी अधिकारी) के.एन.बोरकर(मंडल कृषी अधिकारी)एम.एम.जमदाळ (कृषी पर्यवेक्षक) एम.टी.कोल्हे (कृषी सहाय्यक ) व कृषी विभागाची तालुक्यातील संपुर्ण टिम व सिरपुरबांध येथील नुकशान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
