आमगांवः- (सुरेन्द्रकुमार खोब्रागडे)आज धम्म चक्र प्रवर्तन व वर्षावास समापण कार्यक्रम बुद्ध धम्म कुटी भवभूती नगर आमगांव पुज्य भदंत अश्वघोष व भारतीय बौद्ध महासभा आमगांव (राजरत्न आंबेडकर) यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध कुटी भवभूती नगर आमगांव येथे तालुक्यातील समस्त उपासक व उपासीका यांच्या उपस्थितीत धम्म चक्र प्रवर्तन व वर्षावास समापण कार्यक्रम घेण्यात आलात्यांत भदंत अश्वघोष यांनी महापरित्राण पाठ घेवुन धम्म देशना दिली. भंतेजीना चिवरदान करण्यात आले.डाॅ.बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्मामुळेच दलीतांचे जीवनमान बदलले व आज स्वाभिमानाने जीवन जगत आहेत करिता धम्माचे पालन करून मुलांना धम्म संस्कार देवुन बाबासाहेबांना डोक्यावर नव्हे डोक्यात घेण्याचे आव्हान भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगांव चे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे यांनी धम्म चक्र प्रवर्तन दिन व वर्षावास कार्यक्रमा निमित्त केले.तद्नंतर उपस्थितांना खिर चे वाटप करून भोजन दान देण्यात आला.सदर कार्यक्रमाला संगीता टेंभुर्णे,अॅड. रंजीता खोब्रागडे,निरू फुले,मालता कांबळे,शारदा कोटांगले, माया कांबळे,श्रद्धा शहारे,बिंदू शहारे,नितू शहारे,सुमित्रा शामकुवर,सुनिता राऊत,वच्छला शहारे, प्रियंका शहारे,कल्पना खोब्रागडे,रविकांता शहारे,रिता शहारे, शालू कोटांगले,हेमलता डोंगरे,सुनंदा खोब्रागडे टाकरी,आशिष कांबळे,सुजीत शहारे,अशोक बोरकर,अरूण खोब्रागडे,व भारतीय बौद्ध महासभा आमगांव चे सर्व पदाधिकारी, महिला विंग, उपासक, उपासीका संघ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सुधीर टेंभुर्णे तर आभार कल्पना खेमचंद शहारे यांनी केले
