शेती दिन कार्यक्रम पदमपुर येथे साजरा

देवरीः- आज दिनांक 23/10/024ला मौजा पदमपूर येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत भात पिकाची शेतकऱ्यांची शेतीशाळा व शेतीदिन घेण्यात आला . सभेत उपस्थित शेतकरी ,भात पिकावरील किडी लष्करी अळी, तुडतुडे रोग करपा, कडाकरपा व त्यांचे व्यवस्थापन, तसेच जैविक कीड नियंत्रण साठी कामगंध सापळे, ट्रायकोकार्ड लावणे, तसेच किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखणे,विविध मित्रकिडी व त्यांचे भात शेतीतील महत्व, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन श्री. एस.वाय. येडाम सर कृषि पर्यवेक्षक देवरी यांनी केले.त्याचप्रमाणे जैविक किड नियंत्रण मेटाराईझम व मायक्रोन्यूट्रिएंट याविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर मार्गदर्शन श्री.एम.एम. जमदाड सर यांनी केले .तसेच व्ही एम. बिसेन कृ प उपविभाग देवरी यांनी मेटारा झीम शेतीदिन विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेश .कठाणे कृषी सहायक फुटाणा यांनी केले. तसेच पीक परिसंस्था व आभार प्रदर्शन श्री ए. एच.आर.कडव कृषी सहाय्यक डवकी यांनी केले.अल्पोपहार करून शेतीशाळा व शेतीदिनाची सांगता करण्यात आली , सभेला उपस्थित इ. जी.एस. अई. जी. एस.अंतर्गत उपजीविका तज्ञ श्री. प्रकाश शेलोकर, व गावातील सर्व पुरुष शेतकरी तसेच प्रगतशील महिला शेतकरी उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शेती दिन कार्यक्रम पदमपुर येथे साजरा, ID: 30279

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर