गोंदियाः- गोंदिया विधानसभेत आगामी निवडणुकीत बीजेपी पक्षातुन विनोद अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आज दिनांक २४/१०/२०२४ ला कांग्रेस पक्षाची पहीली यादी जाहीर झाली आहे त्यात गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे.गोंदिया विधान सभेत एस.टी,एस.सी.ओबासी लोकांचे मत सर्वात जास्त असतांनी शुध्दा अल्प मतदारांना प्रास्थापित पक्ष उमेदवार देत असतील तर बहुजनाची मतांची किंमत प्रस्थापित पक्ष करतात काय यांची जाणिव बहुजनांनी केली पाहीजे.आज मतदान हे आमच्या लोकांना सहज मिळाले नाही बहुजनांच्या थोरपुरुषांना किती कष्ट करावे लागले.आपले जिवन झिजावे लागले.आपले पोरं समाजासाठी बलिदान करावे लागले. बहुजनांनी आता तरी लक्षात घेण्याची गरज आहे.आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत मतदानाच्या अधिकार प्राप्त करण्यासाठी किती मोठी कसरत लोकसभेत केली.मतदान हे फक्त टॅक्स भरणा-या लोकांना व शिकणा-यांनाच पाहीजे असे मत असतांनी शुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माहीती होती की बहुजन लोक शिकलेले नाही,उद्योजक नाही मग माझे लोग संसदेत जातील कसेे म्हणुन विरोध असतांनी संसदेत मतदानाच्या अधिकार पारित केला.म्हणुन बहुजनांनी आता तरी जाणिव करुन घ्यावी. (हंसकला गणवीर) भारत मुक्ती मोर्चा महीला संघ अध्य़क्ष गोंदिया
े