नागपुरः- विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपताच नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समाेर आली आहे.दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी झाले आहेत अशी माहीती मिळत आहे.काटोलमध्ये हा हल्ला झाल्याचे समजते आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक हल्यात देशमुख जखमी झाले या हल्यात देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे.त्यांच्या डोक्याला लागलेला आहे.काटोल विधानसभा मतदार संघातील बेलफाटाजवळ ही घटना घडली आहे.देशमुख सभेवरुन परतत असतांना त्यांच्या कारवर दगडफेक झाली.देशमुख यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 92