नागपुरः- राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने प्राध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग चे विविध विषयाला घेवुन बहुजनातील कर्मचारी यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असुन यांचे खालील विषयावर १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायं ५.०० वा ललित कला भवन चॉक्स कॉलनी इंदिरा चौक नागपुर येथे आयोजित केलेले आहे. १) नविन पेन्शन योजनेचे बहुजन कर्मचा-यांच्या वर्तमान व भविष्यावर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय ः एक गंभीर विश्लेषण २) राज्यातील १ नोव्हें २००५ नंतर नियुक्त नगर परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना DCPS/NPS/UPS यापैकी कोणतीही पेन्शन योजना लागु न करणे हे एक षडयंत्र ३) नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणाचे संपुर्णपणे खाजगीकरणाचे धोरण असुन बहुजन समाजाला शिक्षणापासुन,नौकरीपासुन व समस्त संविधानिक अधिकारापासुन वंचित ठेवणे एक षडयंत्र. ४) नविन शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृतीवर आधारित अभ्यासक्रम लागु करणे हे शिक्षणाचे ब्राम्हाणीकरण करुन बहुजन समाजाला मानसिक गुलाम करण्याचे षडयंत्र- एक विश्लेषण ५) कामगार कायद्यात केलेले बदल यांचा बहुजन समाजावर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय ः एक चर्चा ६) २९ नोव्हें २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये विद्यापीठातील कुलगुरु,उपकुलगुरुसह सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्तीः एक षडयंत्र ७) शिक्षण क्षेत्रातील गंभीर समस्यांचे अनुषंगाने निर्णायक लढा उभा करण्यासंदर्भात RMBKS प्रोटानची भुमिका अशा विविध विषयावर कार्यक्रम आयोजित केला आहे तरी बहुजन कर्मचारी यांनी कार्यक्रमात येवुन सर्व समजुन घ्यावे व आपले सांविधानिक अधिकार वाचविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा अशी विनंती प्रोटान ने केली आहे.