साकरीटोलाः- आमगांव विधानसभा क्षेत्रात सन 2024 निवडणुक पार पडली.आमगाव विधानसभा क्षेत्रात 9 उमेदवार पटांगणात उभे होते.त्यामध्ये सर्वात जास्त मते बीजेपी चे उमेदवार संजय पुराम यांचा विजय झाल्यामुळे संलगटोला येथील युवा कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील लाडक्या बहीणी व लाडके भाऊ यांचे स्वागत केले व त्यांना त्यांच्या विजयस्तवामध्ये गोंड नास्त्याचे आयोजन करुन येणा-या काळात संजय पुराम हे आमच्या गावाला भरपुर मदत करुन आमच्या गावातील युवकांसाठी वाचनालय,लाडकी बहीणीसाठी व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणारी आहे. कार्यक्रमाचे आयोजक राहुल फुंडे व क्रांतीलाल येटरे व संलगटोला येथील युवामित्रांनी विजयत्सव साजरा केला.क्रांतीलाल येटरे यांनी सर्व लाडकी बहीणीचे आभार मानले.