बस अपघातातील मृतकाना वाहली श्रद्धांजली
साखरीटोला/सालेकसा -:
आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांच्या मिरवणुकी करिता भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने 29 नोव्हेंबर रोजी सालेकसा येथे विजय रैलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवशाही बसच्या भीषण अपघाताचे वृत्त मिळताच विजय मिरवणुकीत शोककळा पसरली व तात्काळ रैली थांबवून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित होऊन बस अपघातातील मृतकांना मौन धारण करून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आले. विजय रैली पूर्व नियोजित होती मात्र आयोजक कार्यकर्त्यांना शिवशाही बस अपघातात 11 प्रवाशांचा मृत आणि 29 प्रवाशी जखमीं झाल्याची माहिती मिळाल्यावर विजय रैलीत शोककळा पसरली. व आयोजकांनी त्वरितच रैलीतील ढोल तासाचां गजर थांबवून बसच्या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशाना डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ एकत्रित होऊन श्रद्धांजली अर्पित करण्यात आले, आणि जख्मी प्रवाशाना लवकरच आरोग्य लाभ मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केले विजयी मिरवणूकी दरम्यान महायुतीमधील घटक पक्षाचे नेते व कार्यकर्तेही सहभागी झाले होते सर्वानी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहली
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: अपघाताची माहिती मिळताच विजय रैली थांबली, मृतकाना वाहली श्रद्धांजली, ID: 30368
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: अपघाताची माहिती मिळताच विजय रैली थांबली, मृतकाना वाहली श्रद्धांजली, ID: 30368
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]