🔷साखरीटोला येथील सालेकसा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत 4 दिवस कबड्डी, खो-खो, उंच-उडी, लांब-उडी प्रेक्षणीय कवायत, सह रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम
साखरीटोला/सालेकसा-: जिल्हा परिषदेने अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले यामुळे विध्यार्थी शारीरिक व मानसिक रित्या बळकट होतील असे प्रतिपादन आमगाव क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव जिप शाळेच्या पटागंणावर 4 दिवसीय तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. 19 डिसेंबर रोजी प.स. सभापती सौ. प्रमिला गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया जि.प.च्या सभापती सौ. सविता पुराम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिप सदस्या वंदना काळे, विमल कटरे, छाया नागपुरे, गीता लिल्हारे, उपसभापती संतोष बोहरे, पस सदस्य वीणा कटरे, रेखा फुंडे, जितेंद्र बल्हारे, गुमानसिहं उपराडे, सुनीता राऊत, गटविकास अधिकारी संजय पुरी, ठाणेदार भूषण बुराडे, गटशिक्षणाधिकारी डोंगरे, विस्तार अधिकारी एम.एल. मेश्राम, सरपंच नरेश कावरे, उपसरपंच श्वेता अग्रवाल, प्रभाकर दोनोंडे, सुनील अग्रवाल, डाँ संजय देशमुख, डाँ. अजय उमाटे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, युगराम कोरे, देवराम चुटे, संगीता शहारे, पुर्थ्वीराज शिवणकर, राजू काळे, रामदास हत्तीमारे, शामलाल दोनोंडे, राजू डोंगरे, मोहन दोनोंडे, अनंतराम कोरे, मुस्तफा कुरेशी, कृपाल बहेकार, भूमेश्वर मेंढे, अजया चुटे, बी.ओ. ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान क्रीडा आयोजक समिती साखरीटोलाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार संजय पुराम सत्कार करण्यात आले. 4 दिवसीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या सुशोभीत पटागंणावर घेण्यात आले या स्पर्धेत सालेकसा तालुक्यातील केंद्रस्तरीय स्पर्धेतुन यशस्वी झालेल्या प्रतिभावंत खेळाडुनी कबड्डी, खो-खो, नाटिका, एकल, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, प्रेक्षनीय कवायत अश्या विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात रामाटोला, सालेकसा, कोटरा, सोनपुरी, तिरखेडी, झालिया, रोंढा, बीजेपार, साकरीटोला, दर्रेकसा, या 10 केंद्रातील माध्य. व प्राथ. शाळानी भाग घेतले होते. साखरीटोलावासियांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भोजन, पाणी, आरोग्य व निवासाची उत्तम सोय केले होते. कार्यक्रमाला यशस्वी ग्रामपंचायतचे सदस्य, शाळा व्यवस्थापण समितीचे पदाधिकारी साखरीटोला केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, गावकऱ्यानीं परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गौरीशंकर टेभंरे, मनोज मेश्राम सातगाव यांनी केले. प्रास्ताविक वाचनात सरपंच नरेश कावरे, व शिक्षण विस्तार अधिकारी एम. एल. मेश्राम यांनी अटल क्रीडा महोत्सवाची पाश्वभूमी नमूद केले. सदर कार्यक्रमादरम्यान विध्यार्थी, शिक्षक, पालक, आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)