देवरीः-(दि.31-12-2024) आज देवरी येथे भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा च्या माध्यमातुन देवरी येथे भारत बंद करण्याचे कारणे का आहेत.1) केंद्र सरकार ओबीसी ची जातीय जनगना करत नसल्यामुळे आंदोलन 2) संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानजनक विधानामुळे आंदोलन होते.(3) निवडणुक मध्ये ईव्हीम मशिन मध्ये होणा-या गैरव्यवहार विरोधात व Ballot Paper लागु करण्याच्या समर्थनात आज देवरी येथे भारत बंद करण्यात आला होता. भारत बंद रॅली ही बौध्द विहार पासुन ते राणि दुर्गावती चौका पर्यंत काढण्यात आली होती.भारत बंद मध्ये वंदना डोंगरे,करुणा नंदागवळी,कृष्णा ब्राम्हणकर,सनद गुडी,कैलास वैद्य,दिलीप जुडा, प्रमानंद मेश्राम,हंसकला गणविर, विनय लिल्हारे,रोशन मरसकोल्हे,राजु बंसोड,इतर भारत मुक्ती मोर्चा चे सर्व सदस्य उपस्थित होते.
