साखरीटोला/सालेकसा-:
गोंदिया जिल्हा झाडे कुणबी समाजाच्या वतीने प्रकाशित सन 2025 च्या वार्षिक कॅलेंडरचे सालेकसा तालुक्यातील साकरीटोला/सातगाव येथे 5 जानेवारी रोजी युवा कुणबी समाज सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते थाटामाटात विमोचन करण्यात आले. झाडे कुणबी समाजाच्या वतीने प्रकाशित वार्षिक दिनदर्शिकेमध्ये वर्षभरातील सर्व थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सन, उत्सवाची बिनचूक माहिती प्रकाशित करण्यात आले असून कुणबी समाजातील प्रतिष्ठित व्यावसायिक, जिल्ह्यातील नामवंत डाक्टर व त्यांच्या सेवेची सविस्तर माहिती प्रकाशित असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. झाडे कुणबी समाजाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे विमोचन करते वेळी झाडे कुणबी समाज गोंदियाचे सचिव निलेश चुटे युवा कुणबी समाज सेवा समिती साखरीटोलाचे पदाधिकारी प्रभाकर दोनोंडे, रमेश चुटे, देवराम चुटे, मनोज चुटे, विजय रहिले, सौ. टीनाताई चुटे, युगराम कोरे, रमेश बोहरे, पुरुषोत्तम कोरे, व पदाधिकारी उपस्थित होते.
