सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या वर-वधूनां शासनाच्या शुभमंगल योजनेचा लाभ मिळणार
साखरीटोला/सालेकसा-:
सालेकसा तालुक्यातील साकरीटोला/सातगाव येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने आयोजीत कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा 6 एप्रिल रविवार रोजी सकाळी 11.05 वाजता नियोजित वेळी जि.प. हायस्कूलच्या पटागंणावर संपन्न होणार आहे. कोरोना काळाचे दोन वर्ष सोडले तर मागील 22 वर्षांपासून दरवर्षी कुणबी समाज सेवा समिती सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करीत आहे. सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या वर-वधूनां शासनाच्या शुभमंगल योजनेचा लाभ मिळणार असून शुभमंगल कार्यात येणाऱ्या पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था, जेवण, व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी समिती सतत प्रयत्न करीत आहे. सामूहिक विवाह सोहळ्यांचे माध्यमातून गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली असून सामूहिक विवाह सोहळ्यात वर-वधूना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजाला सुद्धा एका मंचावर आणण्याचे काम या माध्यमाने होत आहे. आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात वर-वधूना आशीर्वाद देण्यासाठी गणमान्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. कुणबी समाजाच्या सामूहिक सोहळ्यात जास्तीत जास्त वर-वधूनी नोंदणी करावे असे आव्हान सेवा समितीचे प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, रमेश चुटे, युगराम कोरे, कमलबापू बहेकार, देवराम चुटे, रमेश बोहरे, अरविंद फुंडे, पुर्थ्वीराज शिवणकर, संजय देशमुख, रामदास हत्तीमारे, प्रमोद कोरे, पुरूषोत्तम कोरे, संजय दोनोंडे, योगेश बहेकार, प्रेम कोरे, प्रकाश दोनोडे, संजय बागडे यांनी केले आहे.
