🔷साखरीटोला येथील बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
🔷मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा
साखरीटोला/सालेकसा-: जगभरात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टिव्ही, वृत्तपत्र व अन्य माध्यमातून मिळत असते पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून ती माहिती तूमच्यापर्यंत पोहोचवत असतात. या आधुनिक काळात प्रचार प्रसाराचे नवनवीन विविध माध्यमे असले तरी वर्तमानपंत्राचा ठसा व त्यावरील जनतेचा विश्वास अजून ही कायम आहे असे उदगार सालेकसा तालुका मराठी मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी व्यक्त केले. ते 6 जानेवारी रोजी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे साखरीटोला येथील बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे सचिव प्राचार्य सागर काटेखाये होते. यावेळी दीपप्रज्वलक म्हणून तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, तर प्रमुख अतिथी म्हणून डाँ. अजय उमाटे, जेष्ठ पत्रकार प्रा. गणेश भदाडे, संतोष अग्रवाल, प्रा. मुकेश बावनथडे, तेजस बिसेन उपस्थित होते. प्राचार्य काटेखाये यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय. असे उल्लेखित केले तर डाँ. अजय उमाटे यांनी 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती असे मत व्यक्त करत उपस्थित अतिथीनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचन प्रा. गणेश भदाडे यांनी केले. संचालन कुं. प्राची फुंडे यांनी तर उपस्थितांचे आभार कु. आशा तावाडे यांनी मानले. या प्रसंगी मोठया संख्येने विध्यार्थी उपस्थित होते विध्यार्थ्यांना गोड पदार्थ वितरित केल्यानंतर कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.