🔷घटनेतील ट्रेक्टर व ट्रेक्टर चालक देवरी पोलिसांचा ताब्यात
देवरी : देवरी ते चिचगड मार्गांवर देवरी शहरापासून 4 किलोमीटर अंतरावरील सालई गावजवळ
अज्ञात वाहनाच्या धडकेत 6 जानेवारी 2025 च्या सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान भिषण अपघात घडले होते. अपघातात दुचाकी वाहन चालक युवकाचे मुंडक वेगळ तर धड वेगळ अशी थरारक घटना घडली होती. या संदर्भात अपघात नसून घातपात झाला असावा अश्या चर्चेला पेव फुटले होते.? दरम्यान देवरी पोलिसांनी सदर घटनेला गंभीरतेने घेऊन वेगाने तपास चक्र फिरविले. व 7 जानेवारी रोजी ज्या वाहन ट्रॅक्टरने अपघात घडले तो ट्रेक्टर जप्त करून वाहन चालकास अटक केले आहे. अपघात घडताच वाहन घटनास्थळावरुन पसार झाला असल्यामुळे घातपातच्या चर्चेला वेग आला होता. सविस्तर असे की, निकेश आत्माराम कराडे वय ३२ वर्षे रा. मोहगाव (आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया हा युवक दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान देवरी येथील एमआयडीसी मधील येथील काम संपल्यावर आपली दुचाकी वाहन क्रमांक MH- 35 AV 2968 आपले गावाकडे परत जात असताना, टिन सेट, व ईतर लोखंडी साहित्य घेऊन एक नंबर नसलेला ट्रॅक्टर जात होता की मागेवून दुचाकीने जात असलेल्या मृतक निकेशने सालई गावाजवळ ट्रेक्टरला जोरदार धडक मारली धडक येवढी भयावह होती की निकेशच मुंडक धडापासुन वेगळ झालं होत त्यामुळे निकेश जागीच मृत्यू पावला. घटना घडताच ट्रेक्टर चालक ट्रेक्टर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता. देवरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राम कांदे, अनिल उईके, पंकज राहागंडाले, कापसे, करंजेकर, रोशन डोये, यांनी घटनेतील ट्रक्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. घटना संदर्भात तपासाअंती देवरी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रविण डांगे यांनी सदर घटना घातपात नसून अपघात असल्याचे सांगून घटनेतील ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती दिली. सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गीता मुळे करीत असून तपास सुरु आहे.
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)