गोंदियाः- महाराष्ट्र शासनाने गावातील जि.प.शाळेत CBSE अभ्यासक्रम सुरु केला ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी आनंदाची बाब आहे.पण सन 2024-2025 मध्ये महाराष्ट्रातील जि.प.शाळेमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे कित्येक शाळा बंद करण्याचे शासन निर्णय शासनाने काढलेले आहेत.ग्रामीण भागात विद्यार्थीचे प्रमाण कमी होण्याचे कारणे काय आहेत.ग्रामीण भागातील पालक वर्ग हा जि.प.शाळेत कधीच जावुन पहात नाही की माझ्या मुलांची प्रगती काय आहे या बाबद काळजी घेत नाही.विनाकारण दोष देवुन आपल्या पाल्याचा विकासासाठी प्रयत्न करित नाही. शासनाने गावातील जि.प.शाळेत CBSE अभ्यासक्रम सुरु केला हे अत्यंत चांगली बाब आहे पण अभ्यासक्रमानुसार शिक्षकांची भरती शुध्दा जि.प.शाळेत करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांची आहे. गावातील महीलांचे प्रश्न आहेत की या आधीच जि.प.शाळेत शिक्षक नाहीत तर आता नविन अभ्यासक्रम आल्यावर आमच्या विद्यार्थ्यांना जि.प.शाळेत शिक्षक नसल्यामुळे खरंच आमच्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सुविधा मिळणार का असा प्रश्न महिला वर्गाचा आहे.शासनाने जि.प.शाळेत शिक्षकांची कमी होवु देवु नका अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी आहे.




