(दि.०८)(सुरेन्द्र खोब्रागडे आमगांव) रावनवाडी पोलिस ठाणे अंतर्गत आज दि. ८ जून २०२५ — एकीकडे मृत मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी घाटावर आलेली कुटुंबीय मंडळी, तर दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांसमोर घडलेला आणखी एक भयावह प्रसंग. गोंदिया तालुक्यातील कोरणी घाटात पिंडदानासाठी आलेल्या चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी १२:३० वाजता घडली. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे:
* मिरा ईसुलाल तुरकर (वय ५५)
* मिनाक्षी संतोष बघेले (वय ३६)
* स्मीता शत्रुघ्न टेंभरे (वय ३९)
या तिघीही नागपूरच्या हिंगणा येथील राजीवनगर वॉर्ड क्रमांक ४ येथील रहिवासी होत्या.
घटनेचा तपशील:
मिरा तुरकर यांचा मुलगा मुकेश तुरकर याचे निधन ३० मे रोजी आजाराने झाले होते. त्याच्या पिंडदानासाठी कुटुंबीय व नातेवाईक मिळून २० ते २५ जण कोरणी घाटावर आले होते. पूजा सुरू होण्याआधी काही महिला आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या.
या वेळी मुकेशची वहिनी गायत्री राजेश तुरकर यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मिनाक्षी बघेले यांनी उडी घेतली, परंतु त्या स्वतः बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी स्मिता टेंभरेही पाण्यात उतरल्या, पण त्या देखील बाहेर येऊ शकल्या नाहीत.
तिन्ही महिलांनी गायत्री तुरकर ला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करूनही एकमेकीना वाचवण्याच्या प्रयत्नात तिन्ही महिलांचा जीव गेला आणि हे पाहून मीराताई तुरकर यांनीदेखील मदतीसाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्या स्वतःही पाण्याचा जोर आणि खोलपणा समजून न घेता बुडाल्या. या प्रमाणे चारही महिलांचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण कुटुंबासाठी आणि गावासाठी एक मोठा आघात ठरला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस तपास सुरू असुन
या भीषण घटनेची नोंद रावणवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या घटनेमुळे घाटावर उपस्थित नातेवाईकामध्ये हंबरडा फूटला. पिंडदानासाठी आलेले कुटुंबीय मृत मुलाच्या पिंडदान विधीच्या आधीच आपल्या घरातील चार स्त्रियांच्या मृत्यूचा सामना करत आहेत. कोरणी घाटात अशा अनेक घटना घडत आहेत करिता प्रशासनाने नदी घाटावर ताराचा कुंपण करुन पाण्यात न उतरण्याचे व सावधानी चे संकेत देण्याचे बोर्ड लावावे जेणे करून पुन्हा अशा होणा-या घटणांना आडा बसेल.




