देवरीः- देवरी तालुक्यातील संपुर्ण गावात शेतकरी वर्ग आहे.शेतकरी बांधवानी जुन महिण्याच्या १५ तारखे पासुन धान पिकांची लागवड करणे सुरु केले होते.आज शेतकरी बांधवाचे पिक योग्य व व्यवस्थित होते.शेतकरी लोकांनी धान कापणीला सुरुवात केलेली आहे.कित्येक लोकांचे धान पाण्याच्या प्रभावात आले कित्येक पिक पाण्यात बुडाल्यामुळे अंकुर आलेले आहेत. शेतकरी लोकांची मानसिकता गहान झालेली आहे.शेतकरी लोकांची मानसिकता समजणे सरकार चे काम आहे.सरकार निवडणुक जिंकण्यासाठी शेतकरी लोकांना लुभावन देतो.जिंकुन आल्यावर शेतकरी लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार शेतकरी लोकांसोबत वाटाघाटी करण्यासाठी तयार नाही. शेतकरी वर्गांनी सरकारच्या आमिषाला बळी न पडता आपल्या हक्कांसाठी आमदार खासदार यांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सरकारने शेतकरी लोकांचे पंचनामे न करता सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक आहे.




