आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित 4 आक्टोम्बर रोजी गोंदिया जिल्ह्यात


????सालेकसा येथे आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार
साखरीटोला:- (रमेश चुटे) आमगाव/देवरी विधानसभा क्षेत्रातील भाजप आदिवासी आघाडीच्या वतीने सालेकसा येथील पूर्ती पब्लिक स्कुलच्या पटांगवर भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते 4 आक्टोम्बर रोजी दुपारी 1 वाजता मेळाव्याचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाची अध्यक्षता गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष ऍड. येसूलाल उपराडे करणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी आमदार केशव मानकर, संजय पुराम, भेरसिंग नागपुरे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हणवंत वट्टी, आदिवासी विकास महामंडळचे संचालक भरतसिहं दूधनाग, आदिवासी आघाडी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य शंकर मडावी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता पुराम, देवरी प.स.चे सभापती अंबिका बंजार, देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, माजी सभापती श्रावण राणा, देवराम वडगाये, माजी नगराध्यक्ष वीरेंद्र उईके, माजी जि.प. सदस्य रामेश्वर पंधरे, प.स. सदस्य अर्चना मडावी, रमन सलाम, मनोज इळपाते, वैशाली पंधरे, शामकला गावड, गोविंद वरखडे, रामदास मडावी, भाजपचे तालुका अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, प्रविण दहिकर, राजू पटले, परसराम फुंडे, प्रमोद सांगिडवार, नरेंद्र वाजपेई, सरोज परतेती, नामदेव आचले,तिलकचंद मडावी उपस्थित राहणार आहेत.

आदिवासी बांधवाचे पवित्र व श्रद्धा स्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कचारगडच्या विविध कामांचे भूमिपूजन ना. विजयकुमार गावित यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र पितृ श्राद्धपक्ष सुरु असल्याने आदिवासी पूजनविधी परंपरेनुसार कोणत्याही शुभकार्याची सुरवात करता येत नाही त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे. पण लवकरच भूमिपूजन कार्यक्रमाची तारीख निश्चित केले जाईल अशी माहिती माजी आमदार संजय पुराम यांनीं दिले आहे. आयोजित आदिवासी मेळावा 4 आक्टोम्बर दुपारी 1 वाजता पासून सुरु होणार असून जास्तीत जास्त समाज बांधव व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान माजी आमदार संजय पुराम यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित 4 आक्टोम्बर रोजी गोंदिया जिल्ह्यात, ID: 29092

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर