देवरीः- देवरी तालुक्यातील हरदोली ग्रामपंचायत मधील हरदोली ते मुंडीपार रोड हा पुर्ण खराब झालेला आहे.हा रोड खराब होण्याचा प्रमुख कारण एम बी पाटील कंपनीच्या जड वाहतुकीमुळे रोड खराब झाला आहे.ग्रामपंचायत चे सरपंच व पदाधिकारी यांनी कंपनीला निवेदन दिले त्यावर कंपनीने रोड बनवुन देण्याचे आश्वासन दिले होते.पण कंपनी चे काम पुर्ण झाले तरी कंपनीने रोड तयार करण्यात आले नाही. सरपंच यांचे म्हणणे आहे की गावातील लोकांना रोड मुळे भरपुर त्रास होतो.भरपुर अपघात झाले पण आम्ही कोणत्याही निर्णय घेतला नाही.पण आता नवरात्र येत आहे तरी शासनाने तात्काळ रोड व्यवस्थित करुन द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात य़ेईल. कंपनी ही मोठे अधिकारी व नेत्याच्या ओळखीचे असल्यामुळे ती ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांचे ऐकुन घेत नाही असे सरपंच यांचे म्हणणे आहे.
सरपंच गोरेलाल मलये (हरदोली)