अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्य साखरीटोला येथे भव्य जल्लोष

⚫शोभायात्रेत श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले साखरीटोला नगर
साखरीटोला-: अयोध्या येथील भव्य दिव्य मंदिरात 22 रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या पार्श्‍वभूमीवर साखरीटोला/ता. सालेकसा येथील सकल हिंदू समाजातर्फे मंदिर व परिसर स्वच्छता, विविध धार्मिक पूजन अभिषेक कार्यक्रमासह भव्य शोभायात्रा झांकी कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले होते. सकाळीच हनुमान मंदिरात सुरु झालेल्या पूजन अभिषेक कार्यक्रमानंतर दुपारी 1 वाजता भव्य शोभायात्रा व झांकी काढण्यात आली. झांकी काढलेल्या रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, महाबली हनुमान यांच्या वेशभुषेत छोटे बालक बसलेले होते. डीजे व ढोल-ताशाच्या गजरात केसरी रामनामी झेंडे हातात घेऊन निघालेल्या शोभायात्रेत केसरी वेशभूषा धारण केलेले शैकडोच्या संख्येने युवक-युवती, पुरुष महिला रामभक्त शोभा यात्रेत सहभागी झाले होते. एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषाने संपूर्ण साखरीटोला नगर राममय व भक्तिमय बनले होते. यात छोट्या छोट्या बालकांनी चांगलाच आंनदोत्सव साजरा केला. शोभायात्रा दरम्यान गावातील विविध चौकात तसेच विविध समाजातर्फे शोभायात्रेचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले. तसेच सरबत व पिण्याच्या व्यवस्था करून गोड पदार्थ वितरित करण्यात आले. जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण साखरीटोला नगर राममय व भक्तीमय झाले होते. मार्गावरील प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. तर मुख्य व्दार फुलांनी सजविण्यात आले होते. सायंकाळी प्रत्येक घरातून आरती आणि दिवे आणून हनुमान मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आले. पूजन व महाआरती पश्चात महाप्रसाद वितरित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ललित अग्रवाल, रमेश चुटे, प्रभाकर दोनोंडे, सुनील अग्रवाल, देवराम चुटे, डाँ. अजय उमाटे, पुर्थ्वीराज शिवणकर, बबलू कटकवार, मनोज अग्रवाल, आत्माराम कोरे, श्यामलाल दोनोडे, प्रेमलाल दोनोडे, चंद्रकिशोर लांजेवार, नंदकिशोर लांजेवर, अभय डोमले, संतोष अग्रवाल, (साखरिपाठ) अक्षय मेंढे, प्रदीप अग्रवाल, आशीष बारसे, संकटाप्रसाद मिश्रा, राजेश अग्रवाल, बबलू मेढे, कुसुम नागेंद्र, संतोष अग्रवाल, (मां गौरी) मनोहर देवकाते गुरुजी, विनय मोटघरे, कृपाल बहेकार, गोपीचंद पंजवानी, संतोष बोहरे, मोहन दोनोडे, रतिराम कोरे, अशोक डोंगरे, राजेश दोनोडे, भुवनेश्वर आमकर, नरेश अग्रवाल, फत्तूजी बघेले, संजय मुनेश्वर सलनटोला, सुरेश गुर्वे, प्रेमलाल कोरे रामपुर, पितांबर लांजेवार, राकेश चुटे, मनोज चुटे, सुजीत जायसवाल, अजय अग्रवाल, शोभेलाल चकोले, तुषार शेडे, पाडुरग पीसे, अरविंद असाटी, विजय शेंडे, अरविंद फुंडे, मुकेश फुंडे, भागेश छाबड़ा, किशोर कश्यप, डॉ. संजय देशमुख, इमरान शेख, डॉ. दिनेश कटरे, सौ. वंदना काडे, बल्लूभाऊ ऊईके, आकाश बावनकर, अमृत पटले, डॉ. खुशाल राय, नुर्वी मेडिकल, डॉ श्रीकांत राणा, मुकेश छाबड़ा, सौ. अंजूबाई हूमे, गौरीशंकर डोंगरवार, मनीष चन्ने, सौ.गीताबाई बागडे, गोविंद बागडे, डोमेश्वर लांजेवार, ओमकार कटरे, विरू बावणे, राहुल इंगोले, शैलेश बहेकार, ईश्वर फुंडे, सुनील येडे, अविनाश शेंडे, तुलसीराम मुनेश्वर, संपत मुनेश्वर, मनीषा मेडिकल, गंगाधर मेश्राम, राजेश मुनेश्वर, गोपाल तिराले, सागर कांटेखाये, प्रीतम चौहान, भुमेश्वर मेंढें, अशोक मेहर, शेखर कटकवार, लक्ष्मीनारायण लांजेवार, ललित मुनेश्वर, पुनाराम कावरे, आशिष अग्रवाल, संजय मिश्रा, गगन छाबडा, अंकित मिश्रा, या कुटूंबीयांचा सहभाग लाभला असून गणेश उत्सव मंडळ, व महिला बचत गटांनी परिश्रम घेतले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्य साखरीटोला येथे भव्य जल्लोष, ID: 29451

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर