????मोदीपर्वच देशाला विकासाच्या वाटेवर नेईल- खा. प्रफुल्लभाई पटेल
आमगांव-: दि.०७ एप्रिल रोज रविवारी महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोकजी नेते यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार मा.प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्व मार्गदर्शनात तालुका आमगांव येथे लक्ष्मी सभागृहात जाहीर सभा व महायुतीचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महायुती-एनडीएच्या माध्यमातून राज्यात आणि देशातही पुन्हा मोदींच्या नेतृत्वातील सरकारला मतदारांचा कौल मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार विराजमान होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे खा.अशोक नेते यांच्याप्रचारा साठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते, माजी आ.केशवराव मानकर, माजी आ.भैरसिंग नागपुरे, माजी आ.संजय पुराम, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, सुरेंद्र नायडू यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, विकासाची दृष्टी ठेवून राज्यात भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्रित आले आहेत. गेल्या १० वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या प्रगतीत भर घालणारे अनेक उपक्रम मोदी सरकारने राबविले आहेत. मोदीपर्वच देशाला विकासाच्या वाटेवर नेईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी खा.अशोक नेते यांनी आपल्या भाषणातून गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांची आणि सरकारच्या योजनांमुळे सर्व सामान्य गरीब व शेतकरी लोकांच्या जीवनमानावर कसा परिणाम झाला याची माहिती दिली. ही निवडणूक देशाचं भवितव्य घडविणारी व प्रगती पथावर नेणारी निवडणूक आहे. याकरिता पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजीना पंतप्रधान बनवायचे आहे.यासाठी अब की बार चारसौ पार करत फिर एक बार मोदी सरकार, येत्या १९ तारखेला ला कमळावर मतदान करुन प्रचंड बहुमताने विजयी असे प्रतिपादन खा नेते यांनी या प्रचारसभेला संबोधीत केले. या सभेला शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, राष्ट्रवादीचे नेते नरेश माहेश्वरी, जिल्हा महामंत्री अनिल येरने, तालुकाध्यक्ष राजू पटले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ.अजय उमाटे, शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल, जिल्हासचिव नरेंद्र वाजपेयी, सभापती राजेंद्र गौतम, माजी तालुकाध्यक्ष काशिराम हुकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश हर्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रोहीत शिरसागर, उपसभापती राजेश भक्तवर्ती, शिवसेना तालुका प्रमुख अनिल सोनवाने, जि.प सदस्य हनुमंत वट्टी, जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, राकेश शेंडे, महिला तालुकाध्यक्ष अंजूताई बिसेन, शहराध्यक्षा शुषमा भूजाडे, वृषालीताई पिंडारपूरकर, जिल्हा संपर्क शिवसेना प्रमुख मायाताई शिवणकर, आदी अनेक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.