Published:

लोकसभा निवडणूक आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या… ????पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान

????केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष.
????पहिल्या टप्यातील चार लोकसभा क्षेत्रात महायुतीचे पारडे जड
????चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काट्याची टक्कर
नागपूर-: (महाराष्ट्र)
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होत आहे. देशभरात 102 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. तर महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पाचही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत.
या पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये कांग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजप प्रणित महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी शक्य तेवढा जोर लावलाय. यातच वंचित बहुजन आघाडी, बसपा, अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या पाचही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ठिकाणी सभा घेतल्या आहेत. यात पहिली सभा चंद्रपूर तर दुसरी सभा रामटेक लोकसभा मतदार संघामध्ये झाली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांची देखील एक सभा पार पडली. आता 19 एप्रिल रोजी या पाचही लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.
पाच पैकी चार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पारंपारिक लढत असून, रामटेक मतदारसंघात काँग्रेस व शिंदेसेनेची लढत होणार आहे. सीएनएक्स पोल, सी-वोटरपोल, ईटीजी पोलच्या सर्वे आकलनानुसार महाराष्टातील पाच पैकी, चार नागपूर, रामटेक, गडचिरोली- चिमूर, भंडारा-गोंदिया,
या मतदारसंघात भाजप प्रणित महायुतीचे पारडे जड आहे, तर चंद्रपूर मतदारसंघांत काट्याची टक्कर होत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने तिथे मतदानासाठी सुरक्षेची विषय काळजी घेतली जात आहे. या पाचपैकी फक्त रामटेक मतदारसंघात काँग्रेस व शिंदेसेनेची लढत होणार आहे. उर्वरित चारही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी विदर्भातील पारंपारिक लढत होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: लोकसभा निवडणूक आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या... ????पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान, ID: 29943

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर