🔹10 वी बोर्ड परीक्षा निकाल
🔹उर्वशी दिघोरे 98.40 टक्के,
🔹मौसमी जैतवार 98.20 टक्के
🔹त्रुप्ति लिल्हारे 94.80 टक्के
गोंदिया-:(रमेश चुटे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज 27 मे रोजी 10 वी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले यात लावण्या एजुकेशन सोसायटी द्वारा संचालित चंचलबेन मनीभाई पटेल हाईस्कूल, गोंदिया या शाळेचा शंभर टक्के लागला असून उर्वशी सुनील दिघोरे या विध्यार्थिनीने 98.40 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला, मौसमी मुनेश्वर जैतवार 98.20 टक्के गुण घेऊन दृतीय व त्रुप्ति दिलीप लिल्हारे 94.80 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केले आहे. 98.40 टक्के गुण प्राप्त करणारी विध्यार्थिनी उर्वशी सुनील दिघोरे ही गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावू शकते असा अंदाज वर्तवला जात असून तपासणी सुरु आहे. लावण्या एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र फूंडे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.