🔹कु. भूमिका दिलीप बिसेन ही विध्यार्थीनी 91.80 टक्के गुण घेऊन काटी केंद्रातून प्रथम
गोंदिया-: (रमेश चुटे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज 27 मे रोजी 10 वी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले यात सुकन्या संकल्प निकेतन माध्यमिक विद्यालय काटी येथील विध्यार्थ्यानी अप्रतिम यश संपादन केले आहे. 10 वी परीक्षेत एकूण 144 विध्यार्थ्यानी परीक्षा दिले होते. यात सर्व 144 विध्यार्थी उत्तीर्ण झाले असून. 53 विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, 62 विध्यार्थ्यानी 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, तर 07 विध्यार्थ्यानी द्वितीय श्रेणी प्राप्त करून यश संपादन केले आहे. यात कु. भूमिका दिलीप बिसेन या विध्यार्थीने 91.80 टक्के गुण घेऊन काटी केंद्रातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. आवेश धनलाल ठाकरे यांनी 89.20 टक्के गुण घेऊन द्वितीय, विनय अनिल पटले यांनी 88.80 गुण घेऊन तृतीय, कु. विशाखा मनतराम खैरवार हिने 87.20 गुण घेऊन चौथा, व कु.श्रेया दिनेश डहाट हिने 87.20 टक्के गुण प्राप्त करून पांचवा स्थान प्राप्त केले आहे. सुकन्या विद्यालयातील विध्यार्थी विध्यार्थिनीने अप्रतिम यश संपादन केल्याबद्दल शाळेचे संचालक गजेंद्र फुंडे, प्राचार्य डी.एस. बहेकार, कु.एम.डी.वाढ़ई ए. एम. सेलूकर, बी. सी. बोपचे, एम. पी. रहांगडाले, एम. एन.असाटी, एस.डब्लू. राऊत, एस.एच.मेश्राम, ए.आर. खड़सन, कु.वैशाली दिघोरे,व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.